सावली तालुक्यातील जिबगांव येथे कलार समाज संघटना तर्फे कन्सर शिबीर,निःशुल्क मोतीबिंदू उपचार,शस्त्रक्रिया व आरोग्य शिबिराचे आयोजन.
📍शिबिराचे दि १२ फेब्रुवारीला जनतेने लाभ घ्यावे. - राकेश गोलेपल्लीवार अध्यक्ष कलार समाज तथा सदस्य ग्रा.प.जिबगांव
एस.के.24 तास
सावली : जिबगांव येथे कलार समाज संघटना तर्फे निःशुल्क मोतीबिंदू उपचार, शस्त्रक्रिया व आरोग्य शिबिराचे आयोजन महात्मे आय बँक आय हॉस्पीटल नागपूर व जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती चंद्रपूर द्वारे करण्यात आले असून सर्व जनतेनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन राकेश गोलेपल्लीवार अध्यक्ष कलार समाज तथा सदस्य ग्रा.प.जिबगांव यांनी केले आहे.
शिबिराची वैशिष्ट या शिबिरात डॉ.महात्मे रुग्णालयाचे नेत्रतज्ञ आपली सेवा उपलब्ध करुन देतील.निवड झालेल्या गरजू रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया डॉ.महात्मे नेत्रपिडी व रुग्णालय नागपूर येथे मोफत केले जाईल.नागपूर येण्या-जाण्याची, भोजनाची, निवासाची व्यवस्था निःशुल्क केल्या जाईल.शस्त्रक्रिया करीता येताना निवडणुक कार्ड, राशन कार्ड व आधार कार्ड ची झेरॉक्स सोबत आणावी.
निःशुल्क नेत्र तपासणी व २००/- रुपयात गरजूंना अल्प दरात चष्मा मिळेल.डॉ.नितीन बोमनवार एसोसिएट डायरेक्टर, सर्जिकल ऑन्कोलॉजी एचसीजी कॅन्सर सेन्टर, नागपुर खालील लक्षणांसाठी अवश्य भेटावे:तोंड किंवा जोभमध्ये अल्सर किंवा गाठ/ट्यूमर, अन्न गिळताना त्रास,तोंड उघडताना समस्या,अनियमित रक्तस्त्राव व मासिक पाळीशी संबंधित अडचणी,शरीराच्या इतर भागांवर ट्युमर,स्तनातील गाठ,मानेतील गाठ आदी समस्यांसाठी नक्की भेट देऊन इलाज करून घ्यावे.
सदर शिबिर दिनांक १२/०२/२०२६ ला रोज गुरुवारला सकाळी ११ ते ३ वाजेपर्यत स्थळ :- ग्रामपंचायत सभागृह जिबगांव येथे होणार आहे.या शिबिराचे उदघाटक:- मा. दिनेश पा. चिटनुरवार,माजी बांधकाम सभापती जि. प. चंद्रपूर,सहउदघाटक,मा.नसिंगभाऊ गनवेणवार, सल्लागार कलार समाज सावली,अध्यक्ष,मा.चंदुजी मारगोनवार,माजी पं.स.मुल,स्व.मा.राजु पा. मारकवार,सामाजीक कार्यकर्ता राजगड,दिपप्रज्वलन मा.प्रकाश पा.मारकवार,माजी सदस्य जि.प. चंद्रपूर,मा.डॉ.नितीनजी बोमनवार,नागपूर,मा.डॉ. विजयजी शेंडे साहेब,सावली,मा.अविनाशजी तालापल्लीवार, शिक्षक चामोर्शी
संपर्क : - आशिष गडपल्लीवार मो. नं. ७३५०३२८६४६
विनोद नेरलवार मो. नं. ९८३४७३२९६५
मो. नं. ९६२३४९४९३५ उमेश गोलेपल्लीवार
प्रशांत मेरफुलवार मो. नं. 9657414161
नरेश गडपल्लीवार मो. नं. 9527050793
आयोजक :- श्री.राकेश एम.गोलेपल्लीवार,अध्यक्ष कलार समाज संघटना ता.सावली जि.चंद्रपूर

