महात्मा गांधी नगर परिषद प्राथमिक शाळा,फुले वार्ड क्रमांक 3,गडचिरोली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त 3 दिवसीय बालमहोत्सव उत्साहात कार्यक्रम संपन्न.
एस.के.24 तास
गडचिरोली : महात्मा गांधी नगर परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त 3 दिवसीय बालमहोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. पहिल्या दिवशी दिनांक,22/01/2026 ला विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा आणि मैदानी खेळ घेण्यात आले. दुसऱ्या दिवशी दिनांक,23/01/2026 ला माता पालकांच्या विविध स्पर्धा, हळदीकुंकवाचा कार्यक्रम व पालक सभा घेण्यात आली.
तीन दिवसीय बाल महोत्सव अंतर्गत दिनांक,26/01/2026 ला सकाळी 11 वाजता पासून दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मा. सूर्यकांत पिदूरकर साहेब, मुख्याधिकारी नगरपरिषद गडचिरोली उपस्थित होते.
अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.प्रीती भानारकर तसेच माजी मुख्याध्यापिका सुमित्रा काळे मंचावर उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री.श्रीपाद बन्सोड सर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गेडाम सर यांनी व आभार प्रदर्शन राजगडे मॅडम यांनी केले.
तसेच नवनियुक्त नगरसेविका सौ. मनीषा खेवले, गडचिरोलीचे पोलीस पाटील मा.अनिलजी खेवले तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मंचावर उपस्थित होते.या तीन दिवसीय बाल महोत्सव कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यात आले.वॉर्डातील प्रतिष्ठित नागरिक आणि पालक यांची याप्रसंगी अफाट गर्दी जमली होती हे मात्र विशेष.


