महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव (भोसले) येथे कायदेविषयक,रस्ता सुरक्षा जनजागृती २०२६ व कॅरियर मार्गदर्शन
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : तालुक्यातील महाराष्ट्र विद्यालय ,पिंपळगाव (भोसले) येथे पोलीस स्टेशन, ब्रह्मपुरी च्या वतीने रस्ता सुरक्षा,कायदेविषयक,रोजगार, स्पर्धा परीक्षा,पोस्को व ईतर अमली पदार्थाचे सेवन दुष्परिणाम या विषयी चे मार्गदर्शन ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक रेवणसिद्ध कदम यांनी शालेय विद्यार्थी व गावातील इतर स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना,पालकांना मार्गदर्शक म्हणून केले.
तसेच बीट अंमलदार अरुण पिसे यांनीही या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की मोबाईलचा वापर अभ्यासापुरता करावा अल्पवयात मोबाईलच्या माध्यमातून प्रेम प्रकरणात पडण्यापेक्षा स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम डाऊनलोड करून त्याचे वाचन करावे.पोलीस स्टेशनमध्ये जवळपास १२५ अल्पवयीन प्रेम प्रकरणाने झालेले लग्नाची नोंद झालेली आहे.
मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री ओमप्रकाशबगमारे हे होते.प्रमुख मार्गदर्शक मा. रेवणसिद्ध कदम एपीआय पोलीस स्टेशन, ब्रह्मपुरी,मा.अरुण पिसे बीट अंमलदार पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी यांचे मार्गदर्शन लाभले. प्रमुख अतिथी मा.निखिल लोंढे पोलीस पाटील पिंपळगाव,मा.खंडाईत सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव,श्री महाले सर श्री.राजेश क-हाडे सर व सर्व शिक्षक उपस्थित होते.
मा. कदम साहेबांनी विद्यार्थ्याबरोबर संवाद साधताना स्वतःच्या उदाहरणावरून सामान्य विद्यार्थी सहज पीएसआय ची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो याविषयी विद्यार्थ्यांना प्रेरित केले तर मा. पिसे साहेबांनी रस्ते सुरक्षा, पोस्को कायदा, अमली पदार्थांचे सेवन या विषयावर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनता
रस्ते अपघाताचे वाढते प्रमाण,बालकावरील अन्याय अत्याचार व त्यांचे समाजावर,कुटुंबावर होणारे दुष्परिणाम याविषयी सखोल मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे संचालन श्री.मेश्राम सर तर आभार श्री पुरी सर यांनी उपस्थितांचे व्यक्त केले.कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.


