ब्रह्मपुरीतील कुर्झा वार्डात श्रीमद् भागवत सप्ताह : शतकोत्तर परंपरा

 


ब्रह्मपुरीतील कुर्झा वार्डात श्रीमद् भागवत सप्ताह : शतकोत्तर परंपरा 


अमरदीप लोखंडे - सहसंपादक.


ब्रह्मपुरी : येथील कुर्झा वार्डातील श्री हनुमान देवस्थान सार्वजनिक समितीच्या वतीने दरवर्षी रामनवमी ते हनुमान जयंतीपर्यंत ' श्रीमद् भागवत सप्ताहा'चे आयोजन करण्याची परंपरा शंभराहून अधिक वर्षांपासून सुरु असून वार्डातील वातावरण अध्यात्मिक,शांतीपूर्ण, कारुण्यमय व अहिंसात्मक व्हावे हा यामागील उद्देश राहिला आहे.


 यावर्षी अकोल्याचे प्रसिद्ध कीर्तनकार प्रा.डाॅ.प्रशांत महाराज ठाकरे यांच्या प्रवचनाचा लाभ भगवत् भक्तांना मिळणार असून प्रा.नंदिनी पाकमोडे ह्या पहिल्या दिवशी रामनवमीला आपले विचार पुष्प गुंफणार आहेत.दुस-या दिवसापासून प्रा.डाॅ.प्रशांत महाराज ठाकरे यांच्या सुरेल प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे.रोज रामधून, हरिपाठ व सामुदायिक प्रार्थना अशी दैनदिनी असून शुक्रवार ०३एप्रिल २०२६ ला दु१२.००वा.भागवत,ग्रंथपूजा,कीर्तन,गोपालकाला, पालखी सोहळा आणि साय.६.००वा.महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या सर्व आध्यात्मिक कार्यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री हनुमान सार्वजनिक मंदिर समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !