शहरी भागातील कान्व्हेंट विद्यार्थ्यांना ग्रामीण दाखविल्यामुळे ग्रामीण पात्र विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेशा पासून वंचित. 📍पालकांचे तहसीलदार यांच्या मार्फतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन.

शहरी भागातील कान्व्हेंट विद्यार्थ्यांना ग्रामीण दाखविल्यामुळे ग्रामीण पात्र विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेशा पासून वंचित.


📍पालकांचे तहसीलदार यांच्या मार्फतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. 


अमरदीप लोखंडे - सहसंपादक.


ब्रह्मपुरी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे इंग्रजी शिक्षण मिळावे म्हणून जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना करण्यात आली.या विद्यालयात ग्रामीण भागात शाळा शिकणाऱ्या व नवोदय परीक्षा पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना अंदाजे ७५/६०टक्के जागा राखीव कोटा असतो.


शहरी भागातील नामांकित शाळा जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पात्र परीक्षेचा फॉर्म भरतांना शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रामीण दाखवून शासनाची दिशाभूल करीत असतात हे नुकत्याच लागलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पात्र २०२६ घ्या निकालावरून स्पष्ट दिसून आले आहे. 


त्यामुळे ग्रामीण भागात शाळा शिकणाऱ्या व जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पात्र परीक्षा पास होऊन सुद्धा ग्रामीण व शहरी या कोट्यामुळे खऱ्याखुऱ्या ग्रामीण भागात शाळा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे.


नुकत्याच लागलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या निकालामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी शासनाने खरे ग्रामीण आणि शहरी विद्यार्थी कोण याची सखोल चौकशी करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पात्र परीक्षा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.


अशी मागणी भालेश्वर व अ-हेर नवरगांव येथील पालक किशोर सहारे व हरिदास दिघोरे यांनी मान. तहसीलदार यांच्या मार्फतीने जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदन देतांना त्यांनीख्रिस्तानंद स्कूल ब्रह्मपुरी येथील दोन विद्यार्थ्यांना शहरी भागातील विद्यार्थी असून त्यांना ग्रामीण मध्ये दाखविल्यामुळे आमच्या ग्रामीण भागात शाळा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला.


आणि ते नवोदय विद्यालय प्रवेशापासून वंचित राहत आहेत असे त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांची माहिती देऊन न्यायाची मागणी केली आहे. तसेच ख्रिस्तानंद कॉन्व्हेंट शाळेत शाळा शिकणारे विद्यार्थ्यांचे पालक जर ग्रामीण भागातील दाखल्यासाठी आले तर त्यांची खरी खुरी सत्यता पडताळून दाखला द्यावा अशी विनंती पालकांनी केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !